मी मराठी

केवढे हे क्रौर्य!

Flying High....Image by law_keven via Flickr

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

- ना.वा.टिळक
ई-मेल फॉरवर्ड - आभार - कवी

८ टिप्पण्या:

 1. tilakaanchi "kevadhe he kraurya" hi kaviata Prithvi vruttat madhye aahe.shalet astaana ti kavaita maajhi paath hoti. junya Smrytina ujalaa mlalal.
  chhan !

  उत्तर द्याहटवा
 2. Hi kavita mala phar awadli. Lahanpani ti shalet shikawtana mule vyakul hot, tyana radu yeyi. Nisargashi nate jodnari v mulanwar sanskar kanari kavita ahe.Tasech ti aaeche mahatmya sangate.

  उत्तर द्याहटवा
 3. majhya babana hi kavita shaley pustakat abhyasala hoti.
  aamhala te nehami mhanun dakhavayache.
  ya kavitechya shevatcya kadavyatalya don oli te visarale hote.mi net var surch kelyavar hi kavita mala milali.mala khup aanand jhala.
  mi lagech hi kavita lihun tyana mhanun dakhavali.thanks

  उत्तर द्याहटवा
 4. Every time my father sang this poem, I cried. Hated the cruelty of mankind..very sad but beautiful poem..

  उत्तर द्याहटवा
 5. कविता खूपच छान. हृदयस्पर्शी आहे. ही कविता पुरविल्याबद्दल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 6. hi kavita majhya aai pappana shalet hoti, te nehmi amhala mhanun dakhavat, te mhanat ki guruji hi kavita shikavtanna radayche, aani mulanna hi radavayche. hyachi chal te "susangati sada, ghado srujan vakya kani pado" chya chal var mhanayache, sundar sanskar ghadavnari kavita ahee, dhanyawad

  उत्तर द्याहटवा
 7. क्षैणैक बसले न तो शिरत बाण माझ्या उरी

  उत्तर द्याहटवा
 8. सुंदर कविता! फक्त श्याम कुलकर्णीनी सुचवलेल्या प्रमाणेच मीही एक छोटीशी सुधारणा सुचवितो. पाचव्या कडव्यातील शेवटची ओळ अशी आहे, 'स्मरा मजबरोबरी परि दयाघना ईश्वरा' गैरसमज नसावा माझ्याकडे 'टिळकांची कविता' हे पुस्तक आहे. त्यात खात्री करूनच सुधारणा सुचविली आहे.

  उत्तर द्याहटवा

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...