पु.लं

JOKEImage by zenonline via Flickr

1) पु.लंच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

2) माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .

3) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,
"हा मझा मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,
हा चांगलाच असरणार!"
"हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.
"अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.
म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा