व्याख्या...

Notebook collectionImage by Dvortygirl via Flickr

तज्ज्ञ: ज्याने काल केलेले भाकित आज का खरे ठरले नाही, याचा उलगडा ज्याला
उद्या होतो तो.
शिक्षण: तुम्हाला शाळा-कॉलेजात जे शिकवलं जातं ते संपूर्णपणे विसरून
गेल्यानंतर जे उरतं ते.

सिक लीव्ह: डॉक्टरचे सटिर्फिकेट हा तुमच्या आजारपणाचा पुरावा असू शकत नाही.
तुमच्या डॉक्टरकडे जाण्याइतकी ताकद असेल, तर तुम्ही ऑफिसातही येऊ शकता!!!

जेव्हा एका उत्कृष्ट अभिनेत्याची निवड इतर अभिनेते मंडळी करतात, तेव्हा त्या
सोहळ्याला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा असं म्हणतात.

तर एका उत्कृष्ट अभिनेत्याची निवड इतर नागरिक करतात तेव्हा त्या सोहळ्याला
निवडणूक असं म्हणतात.

कायद्याचा उत्तम अभ्यास असणा-याला चांगला वकील असं म्हणतात. तर समोरच्या
न्यायाधिशाचा उत्तम अभ्यास असणा-याला उत्कृष्ट वकील असं म्हणतात.

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या