काय हरकत आहे?

It's All In Her EyesImage by Brandon
Christopher Warren

via Flickr

आहे माझं प्रेम तुझ्यावर
जीव ओवाळते ना मी
वाट पाहते तुझ्या येण्याची
काय हरकत आहे?

तुझं हसणं बोलणं वावरणं
आवडतं मला
तुझं निखळ स्वच्छ वागणं
मोहवितं मला
काय हरकत आहे?

हो, मी पाहते स्वप्न
तुझ्या माझ्या स्वप्नांची
तू रंग भरावेस असंही वाट्त मला
काय हरकत आहे?

माझी स्वप्न माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?

माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुला “तशी” स्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..

तू प्रेम केल नाही
तरी मी प्रेम करते ना
कुणासमोर नाही तरी
आतल्या आत झुरते ना
काय हरकत आहे?

हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बंधून ठेवायच?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे?

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

  1. "काय हरकत आहे" ही कविता आवडली.फक्त ’बंधन’हा शब्द "बंधनं" असा हवाय असं मला वाटतं.
    savadhan.wordpress.com शब्दकळा ! अवश्य वाचा.

    उत्तर द्याहटवा
  2. काय मराठी माणसा....
    तुझे नाव काय ....
    शुद्ध मराठी माणसाकडून...
    शुद्ध मराठी माणसासाठी....
    शुद्ध मराठी भाषेत...
    "सही आहे रे "

    उत्तर द्याहटवा
  3. hey, khupach chhan aahe, "kay harakat aahe ekhadyar vina apeksha prem karanyat, pan, pan, tya premat swatala haravun swatala sampavatach nahi, tar tyakadun bal (energy) gyayachi, jeevan jagayala.......

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा