मी

Self Portrait in RedImage by Destinys Agent via Flickr

कविता करायला का शिकलो?
कारण आयुष्यात, नेहमीच मी फसलो
कधी प्रवासाची वाटंच चुकलो
मग तिथेच थांबून, खूप रडलो

कधी एका दुःखातून, कसातरी सावरलो
लगेच दुसर्‍या दुःखात मी अडकलो
उगाच वाटे, मी यातून निसटलो
क्षणात लक्षात येई, ईथे मी चुकलो

बर्‍याच्वेळा आयुष्यात, मी ठेचकाळुन पडलो
दरवेळेस मी तेव्हा, नव्या जोमाने उठलो
माझ्याच चुकांमुळे, आपले गमावून बसलो
शेवटी या निरस आयुष्यावर, खुप-खुप हसलो

हसुनसुद्धा सारखं, मी फार थकलो
म्हणून चुकून मी, कविता करायला शिकलो.

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा