हा कवी झालो कशाला....!

Carved gallant genre scene with figurines from...Image via Wikipedia

अर्थ अमुच्या 'वाहवा'चा लावला भलताच केला!
आणि हा आता बघा की, पुर्ण शेफारून गेला!
हा कवी झाला कशाला, नेहमी वाटून जाते...
शेवटी ऱ्हासास याला याच कवितेनेच नेला!

वाचकांचे या कवीने ऐकले नाही कधीही....
हा जरासुद्धा न थांबे वाटतो पुरता हटेला!
खेळ याचा चालतो हा रोज यमके जुळवण्याचा...
आणि मग नशिबात अमुच्या रोज या मेल्यास झेला!

रोजच्या रट्टाळ कविता जाहल्या याच्या नकोशा...
रोज आतंकामुळे या सुन्न मेंदूचा तबेला!
स्पष्ट याला कैकदा सांगून झाले पण तरीही....
रोज नेमाने बघा हा पाडतो ठरवून मेला!

रोज तू आम्हास का छळतोस या जाला वरी रे...
वाटतो "केश्या" अरे तू, त्या कवीश्रींचाच चेला!
इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या