उखाणे ..... सीरियल मधील पात्रांचे:

Hindu marriage ceremony from a Rajput wedding.Image via Wikipedia

आदेश भावजीनी सीरियल मधल्या पात्रांना उखाणे घ्यायला सांगितले तर .....
चला ..... प्रयत्न करूया ......
आसावरी : (अवघाची संसार)
आले मी चंद्रपुरात, सोडून आमची अष्टी
हर्षवार्धानांच्या सहवासात, झाले दुक्खी कष्टी
हर्षदा : (अवघाची संसार)
पंढरपुरच्या देवळात, उभा विठ्ठल सावळा
भावाच्या धाकात राहून, आदित्य झाला बावळा
सरिता : (या सुखांनो या)
हाकारिण्या सुखांना, धरला अभयचा हात
सुखे दूर पळती, होती, दुक्खांचे आघात


मधुरा : (कळत नकळत)
नाव कुणाचे घेऊ, विशाल गौरव की भूषण
नकळत सारे घडते, देऊ कुणा मी दूषण
शुभ्रा : (असंभव)
पडतायत मला स्वप्न, जाणवातोय धोका
आदिनाथांच्या भोवती, सुलेखाचा विळखा
सुलेखा : (असंभव)
गतजन्मीची इच्छा, या जन्मी पुरी करीन
करीन आधी माझा, मग आदिला मारीन
सोपान : (असंभव)
सर्व शास्त्र्यांच्या गळ्यात, घालू फासाचे फन्दे
खजिना मिळवू ऐष करू , ये लवकर ये इंदे
यामिनी : (वहिनीसाहेब)
मार्गात माझ्या येईल जो, त्याला त्याला ठेचीन
भय्या साहेबांना झुकवीन, नि वाहिनी साहेब होईन
जानकी : (वहिनीसाहेब)
किर्लोस्करांच्या साम्राज्याची, घालवेन मी रया
सोडणार नाही तुला सुद्धा, बघून घेईन जया.

....... -मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा