आभाळ भरून आलेय बघ ....

BoatImage by RottenFace via Flickr

पावसा घरून आलेय बघ,आभाळ भरून आलेय बघ
तुझ्याकरता लगाबगीने निघाले मेघ क्षितिजावर विसरून आलेय बघ...
तू अडवले असतेस तर तुझ्याच अंगणी रमले असते खुशाल
खळी गालीची न्याहाळायला माघारी फिरून आलेय बघ
तुझ्याकरता लगाबगीने......

केशर लेउन नेताना व्याकुळ झालेय तुझ्याचकरता कातरवेळी
अस्ताची तमा न बाळगता पदर संध्येचा धरून आलेय बघ
तुझ्याकरता लगाबगीने......


चंद्रही लावला अन्धाराने पणाला , तारकांच्या पटावरती
तिमिराला हुलकावणी देऊन ,डाव चांदण्यांचा विखरून आलेय बघ
तुझ्याकरता लगाबगीने......

निखळून जाता आसव तुझीया डोळ्यातून ,सैरभैर व्हावी आभाळी
थेंब बरसून धरणीवरती ते श्रावण पसरून आलेय बघ..
तुझ्याकरता लगाबगीने......
तुझ्या वाटेकडे डोळे लाउन थकलेले मग ओथंबले दवांसमावेत
पहाटेच उतरले तुझ्या उबरठयावर ,रात्र सरून आलेय बघ
तुझ्याकरता लगाबगीने......

इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक

टिप्पण्या