सुवासिनी

PassionImage by ...-Wink is awaiting inspiration-... via Flickr

चिंब चिंब पावसानं
रान भिजलं भिजलं
धरतीच्या भांगामध्ये
सौभाग्य सजलं सजलं

हिरव्या मेंदीचा रंग
पानापानात पसरे
हळदी कुंकवाचं लेणं
रानारानात विखुरे


रानफुलांचा गजरा
डोई माळला माळला
काळ्या ढगांचा गपोत
गळा बांधला बांधला

सुवासिनीचा मळवट
पूर्वेच्या भाळावरती
झुळझुळते पैंजण
छुमछुम माळावरती

सोळा शृंगारात सजली
माझी ग धरणी माय
सुवासिनीचं हे लेणं
तिचं रूप खुलवत जाय.

...... इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या