एकटेच शब्द माझे.. [Marathi Kavita]

DictionaryImage via Wikipedia

एकटेच शब्द माझे
सोबतीला सूर नाही
दाटले डोळ्यांत अश्रू
पण आसवांचा पूर नाही
हाच आहे तो किनारा
येथेच होती भेट झाली

अन् संपली जेथे कहाणी
तोही पत्थर दूर नाही
तू जिथे अ सशील तेथे
पौर्णिमेचा चंद्र नां दो
आंधळ्या माझ्या नभा ला
चांदण्यांचा नूर नाही


ही मेजवानी चालली
माझाच केला घात त्यांची
पंगतीला या बसावे
मी एव्हढा मजबूर नाही

रात्र त्यांची झिंगलेली
पण आत्मे अस्थिर झाले
शांत आहे झोप माझी
अंतरी काहूर नाही.....

....................... दिनेश

Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा