ॠण या जन्माचे ... [Marathi Kavita]

Secret Society album coverImage via Wikipedia

दोन पाय माझ्या ताईचे
घरभर मला फिरवनारे
दादा दादा म्हणत
आसमंत मिरवनारे....

दोन हात भावाचे
चालायला शिकविनारे
मार्गाताले अडथळे सारून
नवी वाट दाखविनारे...



दोन खांदे बाबांचे..
हसत खेळ्त जिथे झालो मोठा
ज्यावर बसून पाहिल्या मी
आयुष्याच्या नागमोडी वाटा...

दोन शब्द मैत्रिनिचे..
मन शांत करणारे
गोंधळ गर्दी असतानाही
एकांतात गाथनारे...

दोन श्वाश मित्राचे
आधार देणारे खात्रिचे
आठवण बनून साठलेले
गप्पमाधाल्या रात्रिंचे...

दोन डोळे पत्निचे
पान्याने भीजलेले
रात्रभर वात पाहून
भल्या पहाटे निजलेले

एकच रुदय माझ्या आईचे
आन्तंकरणातल्या मायेचे
सगळे काही सामावनारे
आसमंतात ना मावणारे..

एवढे ॠण या जन्माचे
कधीही ना फिटानारे....
....................................................... इमेल फौरवर्ड

Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या