मी मराठी

तिचे अभंग, तिची गाथा !

Lakota storyteller: painting.Image via Wikipedia

सकाळी उठावे | सुसाट सुटावे |
ऑफिस गाठावे | कैसेतरी ||
इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या |
वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या ||

चढावे बशीत | गर्दीत घुशीत |
रोज या मुशीत | कुटताना ||

धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |
गाठण्या मुक्काम | सोस बये! ||


उशीर अटल | चुकता लोकल |
जीवही विकल | संभ्रमित ||

लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||

मस्टर धोक्यात | छकुला डोक्यात |
आयुष्य ठेक्यात | बसेचिना ||

रोजची टुकार | कामे ती भिकार |
बंड तू पुकार | बुद्धी म्हणे ||

एक तो 'वीकांत' | एरव्ही आकांत |
समय निवांत | मिळेचिना ||

तेव्हाही आराम | असतो हराम |
कामे ती तमाम | उरकावी ||

लावून झापड | शिवावे कापड |
तळावे पापड | निगुतीने ||

कामसू सचिव | सखीही रेखीव |
गृहिणी आजीव | प्रियशिष्या ||

काया रे शिणते | मनही कण्हते |
कुणी का गणते | श्रम माझे? ||

नित्याची कहाणी | मनात विराणी |
जनांत गार्‍हाणीं | सांगो नये ||

पेचात पडतो | प्रश्नांत बुडतो |
जीव हा कुढतो | वारंवार ||

"अशी का विरक्त? | व्हावे मी उन्मुक्त |
जीव ज्या आसक्त | ते शोधावे ||

प्रपंच सगळा | सोडूनि वेगळा |
एखादा आगळा | ध्यास घेई ||

तारा मी छेडाव्या | निराशा खुडाव्या |
काळज्या उडाव्या | दिगंतरी ||"

अंगाला टेकत | लेकरु भेकत |
आणते खेचत | भुईवर ||

उशीर जाहला | जीव हा गुंतला |
प्रपंची वेढला | चहूबाजूं ||

कल्पना सारुन | मनाला मारून |
वास्तव दारुण | स्वीकारते ||

बंधने झेलावी | चाकोरी पेलावी |
वाट ती चालावी| 'रुळ'लेली ||

विसर विचार | रोजचे आचार |
होऊनि लाचार | उरकावे ||

काही न मागणे | केवळ भोगणे |
रोजचे जगणे | विनाशल्य ||

हा जन्म बिकट | गेलासे फुकट |
हाकण्या शकट | संसाराचा ||

तरीही अखंड | आशा ही अभंग |
मनी अनिर्बंध | तेवतसे ||

ठेवा तो सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |
विसर जगाचा | पाडी झणीं ||

जातील दिवस | निराश निरस |
झडेल विरस | आयुष्याचा ||

खरी की आभासी | आशा ही जिवासी |
बळ अविनाशी | देई खरे ||

पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||

................................. मुळ लेखन नंदन - मराठी साहित्य
[ई-मेल - प्रथमेश पाटोळे]
Reblog this post [with Zemanta]

५ टिप्पण्या:

 1. नमस्कार प्रथमेश, मूळ कविता ह्या दुव्यावर आहे - http://marathisahitya.blogspot.com/2008/02/blog-post.html. संकलन करायला काहीच हरकत नाही, पण असं करताना कृपया मूळ कवीचे नाव आणि दुवा देणे आवश्यक आहे.

  उत्तर द्याहटवा
 2. प्रथमेश पाटोळे ही कविता तुमची नाही आहे. तुम्ही ही कविता इथे कॉपी पेस्ट करताना मुळ कवि नंदन होडावडेकर यांना विचारले होते का?

  हे असले चोरीचे धंदे बंद करा.

  http://www.misalpav.com/node/746

  उत्तर द्याहटवा
 3. @नंदन, @निनावी,
  सदर लिखान प्रथमेश नी पाठवलेली आहे, कदाचित त्यांनाही ही मेल फौरवर्डेड असु शकेल. पाठवलेल्या लिखानात मुळ लेखकाचे नाव नसल्याने, पाठवणाराचे नाव पोस्टखाली लिहिले आहे.
  सदर लिखान नंदन यांच्या ब्लौग वर आहे त्यामुळे वरील लिखानाखाली त्यांचे नाव - अपडेट करुन - लिहिले आहे.

  चूकभुल माफ असावी.

  गुरु.
  मी मराठी'साठी

  उत्तर द्याहटवा

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...