Image by Roobee via Flickr
वसंत ऋतुचे सजणे झाले बंद?...
कसा चंद्रही अंधाराने व्याकुळ?
आज चांदणे पडणे झाले बंद!...
श्रावणातला पाउस येतो-जातो;
पावसातले भिजणे झाले बंद!...
वाट कुणाची कोणी पाहत नाही;
डोळे लावुन बसणे झाले बंद!...
डोळ्यांमध्ये येतच नाही पाणी
रडणे आणिक हसणे झाले बंद!...
शहरामध्ये अमाप गर्दी झाली;
मनुष्य तरिही दिसणे झाले बंद!...
जमती अड्डे मित्रांचे पण माझे-
तिथले उठणे-बसणे झाले बंद!...
स्वतःशीच मी हितगुज करतो आता
कुणास काही म्हणणे झाले बंद!...
'अजब' मनाला सुचेल ते-ते लिहितो;
'कोणासाठी' लिहिणे झाले बंद!...
काय सांगता ... लिखान आवडले?
मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.
![Reblog this post [with Zemanta]](http://img.zemanta.com/reblog_e.png?x-id=77d012dd-5f06-4035-963c-25321bd72b06)




0 comments:
Post a Comment