अळवावरच्या पाण्यात [Marathi Kavita - Poem]

Water, the spice of lifeImage by Kaustav Bhattacharya via Flickr

"अळवावरच्या पाण्यात मी
आताच न्हाऊन आलोय
आठवणींचा गाळ मी
आताच जाळून आलोय

खरचं,
शब्द हे मुके असतात
डोळे हे अधु असतात
तु असलीस नसलीस तरी
पापण्या मात्र रडत असतात



एकच गोष्ट आता मी
तुझ्याकडून शिकलो
जाळलेल्या आठवणींवर
जगायला शिकलो

मात्र आता खूप झाले
तुझ्यासाठी झुरणे
आसवांच्या नदीमध्ये
पुन्हा पुन्हा डुंबणे

ठरवलयं,
आता एकच गोष्ट करणार
समोर तुझ्या असाच जगणार
पाहू नको तेव्हा तू
माझ्या डोळ्यामध्ये
अधू ते नक्कीच असतील
"पाऊलखुणांमध्ये"

समोर कधी आलीस तरी
खंबीर उभा राहीन
चुकुनच जर बोललीस तर
हसून दाद देईन

"पण,"
यापुढे मात्र मला आठवू नकोस
स्वतःसाठी मला तू साठवू नकोस
कारण,

मीच नसेन तेव्हा
तुझ्या कश्यासाठीही
एकच फक्त असेल तेव्हा
"तुझ्या जीवामधूनी"

अळवावरच्या पाण्यात तेव्हा
तू न्हाऊन येशील
आठवणींचा गाळ तेव्हा
तू जाळून येशील."

---संदिप उभळ्कर
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या