आठवते का तुला? [Marathi Kavita - Poem]

Caribbean beachImage by wisze via Flickr

आपली नवीन ओळख झाली होती
फोनवर तासन् तास गप्पांची साथ होती......
आठवते का तुला?
आपण पहिल्यांदा भेटायचे ठरवले
एकमेकांना पहिल्यांदा पहायचे ठरवले......

आठवते का तुला?
आपलं पहिल्यांदा समुद्रकिनारी भेटणं
एकमेकांची नजर चुकवुन एकमेकांना न्याहाळणं......
आठवते का तुला?
माझ्या मनातलं गुपित मी सांगितलं
तू पण प्रेम करतोस माझ्यवर हे जाणवले......
आठवते का तुला?



त्यानंतरचं आपलं वारंवार भेटणं
थोड्याशाही विरहाने आपलं अगतिक होणं
किती स्वप्नवत होते ते दिवस
सदा तुझ्याच विचारांत असे हे मन
आज तू ही तोच आहेस
आणि मी ही तीच आहे
आपलं प्रेम ही अगदी तसंच आहे
किंबहुना ते अधिक वाढलं आहे
आज आपल्यामध्ये काही नसेल
तर ती एकच गोष्ट....वेळ
पटतं रे मला पण....

शरीराने दूर असलो तरी मनाने आहोत जवळ
चूक तुझीही नाही, कामाचा व्यापच तुंबळ
खुप समजावलं वेड्या मनाला, सर्व परत नीट होईल
वेळात वेळ काढून, तो तुला भेटायला येइल
मनाला आवर घालणं नाही रे जमत मला
सारखं रागावून त्रास नसतो द्यायचा तुला
समजून घे रे मला.....
वाटेकडे डोळे लावून तुझ्या
विचारांत असते फक्त तुझ्या
प्रत्यक्षात नाही जमलं तर
स्वप्नांत तरी येशील ना माझ्या?

..................... इमेल फौरवर्ड
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या