मुक्ती ... [Freedom - Marathi Poem - Marathi Kavita]

A painting of God watching as an angel and a d...Image via Wikipediaमेलेल्या जनावरांना वेदना होत नसतात
त्यांची स्पर्शजाणीव त्यांच्यासोबतच निघून जाते
उरतात फक्त कुजत राहणारे देह ..
आसमंतात भरणारा एक कुबट गंध ..
आणि जमत राहणारे उपाशी गिधाडांचे टोळ
मग तो देह मेजवानी बनून जातो ..
निसर्गाचे नियमच अवघड,
एकाचा मृत्यु आणि दुसऱ्याची भुक, यांचेही किती सहज अर्थ जुळवले आहेत
बरेच नियम मात्र अजुनही कळायचे आहेत ..


मी अजुन वाट बघतो आहे
कधीतरी कुणी एक तेजस्वी येईलच ..
तेव्हां मी असाच शरीराशिवायचा असेल तरी चालेल ..
निदान या मृत्युलोकातले अघोर दुःस्वप्न पुन्हा नसेल डोळ्यांत ..
मी अजुन वाट बघतोच आहे ..
.....................................................................

तितक्यात आलाच तो हात पसरवून खुणावत ..
मग एका स्पर्शाचा फक्त टिंब होऊन
त्या आकृतीमागे मी आपोआप ओढला गेलो
अनंत अंतराळाकडे
क्षणार्धात ... अगदी क्षणार्धात संपलं जन्म मृत्युचं नातं ..
अश्रुंचे पाश तोडले गेले
अंतराळातल्या अंधाराची तेजस्वी दुनिया ..
ह्यालाच म्हणतात का मुक्ती ??
असेल कदाचीत ..

जे असेल ते .. पण अगदी निराळं विश्व ..
ओमकाराचे गुढ ध्वनी सर्वत्र पसरलेले
तरंगणाऱ्या असंख्य सुर्यमालिका, अगणित तारे, ग्रह ..
आणि त्या सगळ्यांचा एक तरंगता भाग झालेलो मी
मुक्ती .. मुक्ती .. मुक्ती
इथे प्राणवायुची गरज नाही कदाचीत ..
असावीच कशाला ?
तो देह तर सुटला कधीच
अताशा गिधाडांच खाद्य झाला असेल ..
कदाचीत एक प्रांजळ मुखाग्नीदेखील मिळाला असावा ..
असो.
त्याचे काय ..
वेदना त्याच्यासोबतच संपली नाही का ??

.....................................................................
आता मी मुक्त आहे ..
वेदनांशिवायचा,
अश्रुविरहीत ...
आताच अजुन एक उमगलय ...
या आत्म्यावर जखमांचे व्रणही नसतात ..
हेच तर हवं होत जन्मापासून
मात्र मेल्यावर मिळाल ईतकच
पुन्हा एकदा "विरोधाभास"

.....................................................................
एक प्रश्न आताही जाणवतो मात्र ..
या मुक्तीतून मुक्ती नाहीच का ????

............................................................ वैभव जाधव
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या