प्रेम कर भिल्लासारखं

A man and a woman performing a modern dance.Image via Wikipedia

पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा


मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावणइंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा होजाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्याभातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धामेघापर्यंत पोचलेलं

शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
................................... कवि कुसुमाग्रज

टिप्पण्या

  1. आपला ब्लॉग छान आहे, पण यावर काही जाहिराती दिसल्या, हे मात्र खटकले. मराठी साहित्याचा प्रसार करण्याचे आपले प्रयत्न स्तुत्य असले तरी हे साहित्य इतरांचे असल्याने त्यातुन उत्पन्न मिळव्ण्याचा केलेला कोणताही प्रयत्न हा कॉपीराईट कायद्याचा भंग ठरतो. तेव्हा कृपया जाहिराती हटवाव्यात. आपला प्रयत्न मात्र नक्कीच स्तुत्य आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. @अमित
    मी मराठी आपण दिलेल्या भेटीबद्दल आणि मताबद्दल आभार.
    १. या ब्लौगवरील लिखान / साहित्य हे इतरांचे आहे - मान्य आहे शिवाय तसे ब्लौगवर लिखितही आहे. बहुतांशी लेखक / कवी त्यांचे लिखान इथे प्रसिद्ध करण्यासाठी पाठवतात. ज्यांचे लिखान आहे त्यांच्या नावानेच ते प्रसिद्ध करण्यात येते. ब-याचदा फौरवर्डेड मेल असतात. आम्ही कोणत्याही लिखानास "स्वतःचे" म्हणुन छापत नाही!
    २. जाहिराती - प्रसिद्धीचे काम - वेळात वेळ काढुन व घरुन केले जाते त्यासाठी वापरात येणा-या "इंटरनेट" आणि "इलेक्ट्रीसिटी" चा माफक खर्च निघावा - एवढीच अपेक्षा - !

    वादा-वादीत न पडता, हा उपक्रम [ सप्टें २००४ पासुन चालु असलेला ] सर्वांच्या सहकार्याने असाच चालु रहावा ही अपेक्षा!

    आभार,
    गुरु

    उत्तर द्याहटवा
  3. Dear Guru,
    I think there is still a point there in comment. It's good rather great that you give exposure to literature but to whose literature? I don't think work by people like Kusumagraj, Padgaonkar etc. needs exposure from a blog, rather these posts make a blog more interesting.

    If you are giving exposure to new poets by posting their work [with their permission of course] it's a great contribution and no one would question about adds. But use of already popular literature under name of giving exposure to it might be questionable.

    Yes, you deserve to ask for whatever expenses you had to run this blog [that too for so many years] but only if you are exposing unknown treasure of literature to world.

    Please don't take my comment as offense [as seems you took Amit's :)]. I just tried to put my view.

    Thanks,
    Rajeev

    उत्तर द्याहटवा
  4. Hi Rajiv,
    Good to hear from you.

    1. I agree, that the literature from people like [respected] Kusumagraj, Padgaonkar etc. definitely do not need any exposure[at least from such blogs]. The term, 'giving exposure' never applied to them and we never meant that and even never said that! So please never consider/ think in that way. As said before, we receive forwarded emails and can have contents like this poem by Kusumagraj. Its our pleasure and proud to have such literature here making a blog interesting!

    2.Your comment [and Amit's too] is considered as a suggestion/ opinion and not as an offense :) One should reply to reader's comment to make their views clear.

    Thank you again for making your opinion and visiting Me Marathi!

    Best Regards,
    Guru.

    उत्तर द्याहटवा
  5. I apologise, but, in my opinion, you are not right. Let's discuss. Write to me in PM, we will talk.

    उत्तर द्याहटवा
  6. In my opinion, it is an interesting question, I will take part in discussion. I know, that together we can come to a right answer.

    उत्तर द्याहटवा
  7. Mitrano jya koni ha blog tayar kelay to marathi lokansathich aahe aani sarvottam aahe...tyamule tyat positive goshti shodha..ugachach nigative points var bot naka thevu....ya blog ne kitek navya kavina ek platform milalay.....yasathi ya blog che aabhar nako ka manayla....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा