Image via Wikipediaअसेल कोणीतरी एखाद्या वळणावर
माझीही वाट पाहणारी
माझ्याचसाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली....
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझं एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझं दु:ख आपले मानणारी
मला समजुन घेणारी....
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
केवळ माझ्याचसाठी जगणारी
आणि माझ्याचसाठी मरणारी...
असेलही कदाचित...!
............................... आभार कवि
काय सांगता ... लिखान आवडले?
मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.
![Reblog this post [with Zemanta]](http://img.zemanta.com/reblog_e.png?x-id=821ec207-db42-42f6-8ef7-53d4b72ed498)





1 comments:
kavita khup surekh ahe.
pratyekachya ayushyat konitari asat he patvun denari kavita ahe.
pratyek konasathitari anmol ase darshvnari kavita ahe
Post a Comment