माझ्या चारोळ्या...काही भावना... [Marathi Charlya]

*winter*Image by just.K via Flickrअश्रुंमधला खारटपणा हल्ली
जास्तच वाढत चाललाय
.
.
.
.
.
वाटतयं जमीनीचा नापीकपणा आता भोवतोय...

तुझ्या क्षितिजाच्या त्या
हळव्या आणि पुसट कडा
संभ्रमाच्या छायेमधील जणू
सप्तरंगी बिकट छटा

त्या झुरण्यात पण एक मजा असते
हसता हसता पाठून रडण्यात वेगळी मजा असते
प्रेम मिळो अगर न मिळो
त्यासाठी जीव तोडून धावण्यात वेगळी मजा असते

मीही आता आवरून घेतलंय
नाईलाजाने सावरून घेतलंय
रात्रीच्या त्या अगणित थेंबाना
मीही आता चांदण्यांशी थेट वावरू दिलयं

माझी तर आता कातरवेळ आहे
सांज तर गेली पण अंधाराची वेळ आहे
तू मात्र मनात आहेस..
जसा आभाळात तोही निरंतर आहे...

डोळेही हल्ली मला आता
तुसरयासारखे वागवतात
शब्दातून जरी तू डोकावलीस तरी
आनंदाने उशीवर रात्रभर रांगोळी काढत राहतात......

श्रावणसरीही मित्रा आता
परक्यासारख्या वागतात
उनपावसाच्या मतलबी खेळात
आपल्याच डोळ्यातून धावतात

तुझ्या आणि माझ्यामध्ये आता
फक्त इतकेच अंतर उरले
पाऊस येऊन सरून गेलाय
आणि अश्रु मात्र माझेच कोरडे राहीले

प्रेम जेव्हा उमलत होतं
तेव्हाच सारं बरसत होतं
आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला
तेच तेव्हा फसवत होतं....

तसेच काहीसे कातरवेळचे असते
लालगोळ्याच्या निरोपाचे..
..त्याला अमुक आमंत्रण असते
दिवा पेटून कसा जळवून जातो
पहाटेच्या किरणांना याचेच मुळी वावगे असते

............................................................ संदिप उभळ्कर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा