एक भेट काय टळली...

KosherImage by Jim Blob Blann via Flickrपहायचे होते मला...
तुझ्या डोळ्यांत, माझे प्रतिबंब...
पहायचे राहुन गेले...
ऐकायचे होते मला...
तुझ्या आवाजात, माझे नाव...
ऐकायचे राहुन गेले...

अनुभवायचे होते मला...
तुझ्या श्वासात, माझे श्वास...
अनुभवायचे राहुन गेले....

तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे ... राहुन गेले..


भेटीचे तर होते.... फक्त बहाणे
मजसाठी तर झाले असते ते 'जगणे'...

तुझ्या डोळ्यांच्या तेजात,
उजळले असते लक्ष दिप, माझ्या नेत्रांत..
जे तेवत राहिले असते, उदास अंधा-या रस्त्यांत...

तुझ्या श्वासांच्या सुगंधात,
फुलले असते संजीवन प्राण, माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन, श्वांस रोखणा-या क्षणांत...

तुझ्या आवाजाच्या मरव्यात,
गुंजले असते मधुर गीत, माझ्या आत्म्यांत,
जे देत राहिले असते साद, भग्न एकाकी आयुष्यात...

पण.. पण...
एक 'भेट' काय टळली..
अन् जगायचे राहुन गेले...
'तुझ्यासोबत' जगायचे राहुन गेले...


............................................................. स्वप्ना

टिप्पण्या