तु असतीस तर

तु असतीस तर झाले असते
सखे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे

बकुळुच्या फुलापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
आणि रंगानी केले असते
क्षितिजावर खिन्न रितेपण

पसरली असती छायांनी
चरणातली म्रूद्शामल मखमल
आणि शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसुन मिश्किल

तु असतीस तर झाले असते
आहे त्याहुन हे जग सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धुसर अंतर ...

.... कवि - मंगेश पाडगावकर
[आभार त्रिवेणी]



काय सांगता ... लिखान आवडले?

मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !

तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.

तुमचा ई-मेल:


0 comments:

Grab this Widget ~ Blogger Accessories