Show/ Hide Image Version! [+ / -]
प्रेम आणि लग्न
यांत बरेच अंतर आहे
आनंद आधी आहे
पश्चाताप त्या नंतर आहे...
लग्नाच्या जोडप्यांकडे पाहत
रेखा मनात झुरते
म्हातारपणी तरी बच्चन भेटेल
म्हणुन रोज पुजाअर्चा करते....
लग्न या शब्दाचा अर्थ
आपण किती वेगळा लावतो
बायकोच्या आग्रहाला आणि त्रासाला
आपण संसार का म्हणतो...
गर्लफ्रेंड मल्लिका सारखी असावी
इथे प्रेत्येकाला वाटत असते
लग्नासाठी मुलगी बघताना
नजर मात्र ऐश्वर्याला शोधते...
प्रेयसी पत्नी झाल्यावर तिच्यातील
"बायको" जागी होते...
..................... धिरजसिंह मोहिते
काय सांगता ... लिखान आवडले?
मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.






0 comments:
Post a Comment